🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर अचानक शिवसेनेने महायुतीमधून बाहेर पडत विरोधी लक्ष मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यानंतर सर्वाधिक १०५ आमदार असलेल्या भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले.
महाविकास आघाडीत एक विचारधारा असलेले पक्ष नसल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही अशी टीका भाजपाकडून केली जात होती, तर हे सरकार स्थिर असून भाजपाला पुढील काळात विरोधी बाकावरच समाधान मानावे लागेल असे स्पष्ट केले जात होते.
गेल्या २४ तासांत देशातील नव्या कोरोना बाधितांचा उच्चांक! तर आतापर्यंत ६० हजारहुन अधिक मृत्यू
https://twitter.com/MHVaghadi/status/1298828928509865986
आता, महाविकास आघाडीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “पुढचा प्रधानमंत्री लग्न झालेला असावा, कारण तो मन कि बात बायकोशी करेल आणि काम कि बात जनतेशी “, अशी जहरी टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या ३५ कोटींच्या धमकी प्रकरणी एकाला अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

