नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान,पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प (1.03 लाख कोटी), यामध्येच इकॉनोमिक कॉरिडोअर बनवले जातील. तर केरळमध्येही 65 हजार कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग बनवले जातील अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरोडोअरची घोषणा देखील करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमध्येही कोलकाता-सिलीगुडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय आसाममध्ये पुढील तीन वर्षात हायवे आणि इकॉनॉमिक कॉरिडोरची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान,या चारही राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच केंद्र सरकारने या घोषणा केल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- #Budget2021 : नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद
- #Budget2021 : मध्यमवर्गीय,बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा बजेटमधून पूर्ण होणार का?
- #Budget2021 : यंदाच्या अर्थसंकल्पात गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता
- #Budget2021 : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचं बजेट असावं : संजय राऊत
- #Budget2021 : १५ वर्ष जुन्या वाहनांसाठी आता ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’


