🕒 1 min read
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील कोविड योद्ध्यांना सामावून घेण्याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. औरंगाबाद मनपातील कोविड योद्ध्यांना ६ महिन्यापासुन पगार नाही. आरोग्यासाठी निधी कमी पडु देणार नाही म्हणता आणि पगार मागितला तर अडचणी काय सांगता ? असा सवाल आयटकच्या वतीने थेट मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.
हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादला मुख्यमंञी उद्धव ठाकरे आले होते. यावेळी आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे विमानतळावर निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, नेहमी दिलासादायक बोलणारे मुख्यमंञी कोविड योध्यांच्या पगाराचा विषय काढताच अडचणी आहेत. आपण एक एक प्रश्न सोडवतोय असे सांगितले जाते. आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी अॅड. अभय टाकसाळ यांनी आरोग्यासाठी निधी कमी पडु देणार नाही म्हणता आणि पगार मागितला तर अडचणी काय सांगता ? याबाबत विचारले.
याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथील कथित कंञाटी कामगारांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले. परंतु अजुन अंमलबजावणी केलेली नाही. असेही आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना . यावेळी शिष्टमंडळात युनियनचे सेक्रेटरी अॅड. अभय टाकसाळ यांच्यासह विकास गायकवाड, महेंद्र मिसाळ आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्यांवरील कारवाईवर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…
- ‘राज्यात नाटक-सिनेमे बंद त्यामुळे जनता सोमय्या व पाटील यांचे हे फुकटचे मनोरंजन पाहतेय’
- कृषी अधिकारी उपस्थित नसतील तर पंचनामे करू देऊ नका, आ. राजेश पवार यांचे आवाहन
- सोमय्यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी एक दगड मारला तरी महागात पडेल; चंद्रकांतदादांचा महाविकास आघाडीला इशारा
- विराटच्या ‘त्या’ निर्णयाला सेहवागचा विरोध; म्हणाला, ‘याला काहीच अर्थ नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
