Share

मराठी पाट्यांची काय एलर्जी? माय मराठीला विरोध करून आणखी किती ‘जलील’ होणार?-रूपाली पाटील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: महाराष्ट्रात दुकानावर मराठी पाट्याची इम्तियाज जलील यांना काय ऍलर्जी आहे? माय मराठीला विरोध करून आणखी किती जलील होणार? असा तिखट सवाल नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या आणि आधी मनसेत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना विचारला आहे. महाविकास आघाडी सरकारने नुकताच मराठी पाट्यांवरुन निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे.

मराठी अस्मिता टिकवण्यासाठी राज्य सरकारने मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्व दुकानांवरच्या पाट्या या मराठी भाषेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोठ्या दुकांनाप्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील.

मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी मराठीत पाठव केल्यानंतर मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का असा सवाल उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी ही आता यावर उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्यांची जलील यांना काय अॅलर्जी आहे? माय मराठीला विरोध करून आणखी किती जलील होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते खा. जलील?

जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मूर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डॉलरचा प्रश्न आहे. अशी टीका औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी देखील यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!