Share

राज्यात ३१ जुलैनंतर लॉकडाऊनच काय? उद्धव ठाकरेंनी केला खुलासा

Published On: 

मुंबई: कोरोना महामारीचा थैमान हा गेले ३ महिन्यांहून अधिक काळ सुरु आहे. तर राज्यासह देशात संसर्गाच्या प्रतिबंध घालण्यासाठी टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊन करण्यात आले होते. तर केंद्र सरकारने व राज्य सरकारने ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन व निर्बंध जाहीर केले होते. आता हे कालावधी संपण्यास एक आठवडा राहिल्याने पुढे काय, अशी विचारणा केली जात आहे.

तर, करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ जुलै रोजी संपत असून त्यानंतर निर्बंध शिथील केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथील केले जातील असं सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

‘मी साठाव्या वर्षी मुख्यमंत्री असलो तरी याच’साठी’ केला होता अट्टहास असे नाही’

“मी लॉकडाउन हा शब्द वापरत नाही आहे. मी याला अनलॉकडाउन असं म्हणत आहे. सध्या असलेले निर्बंध शिथील केले जातील. आपण सध्या मुंबई महानगर प्रदेशातील आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा अजून मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहोत. याशिवाय ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे जास्त काळजी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता राज्यातील अनेक जिल्ह्यांसह शहरांत लॉकडाऊन करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना दिलं ओपन चॅलेंज, हिंमत असेल तर…

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलैनंतरचं धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सूचनांची वाट पाहणार आहे. “निर्बंध शिथील होतील, तसंच राज्यांना निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. केंद्राच्या सूचनांवरच राज्याचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना अवलंबून असतील”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “केंद्र सरकार जीम, रेस्टोरेंट्स आणि स्विमिंग पूल सुरु करण्यासाठी परवानगी देईल असं वाटत नाही. तसंच शहर आणि ग्रामीण भागात बसेसनाही परवानगी देण्याची शक्यता कमी आहे. शेवटी हा सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न आहे”.

शिवछत्रपतींच्या जयघोषाचा वाद; रितेश देशमुखने दिली लक्ष्यवेधी प्रतिक्रिया

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!