🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना हिंमत असेल तर माझी मुलाखत सुरु आहे, सरकार पाडून दाखवा, असं थेट आव्हान दिलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं.
सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अनलॉक मुलाखत घेतली आहे. पण संजय राऊत पूर्ण मुलाखत रिलीज करण्यापूर्वी ट्विटरवर याचे प्रोमो शेअर करत त्याबद्दलची उत्सुकता वाढवताना दिसत आहे.
या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी यासाठीच केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्रात तीन चाकी सरकार.
मग केंद्रात किती चाकी आहे?"
ऊध्दव ठाकरे यांची Unlocked मुलाखत.
सामना pic.twitter.com/uuBM1BewyN— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2020
विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
उदयनराजेंच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, खासदारकीची शपथ घेताच मिळाली केंद्रात मोठी जबाबदारी
‘मदरशांसाठी कोट्यावधींचा निधी तर कोविड योध्याचे वेतन अजूनही थकलेले’
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको – अमित देशमुख
“नगरसेवक हरवले आहेत, आजारात सोडलत आता आम्ही मतदान करताना सोडतो!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
