Share

महागाई विरोधात काँग्रेसचा आंदोलनांचा धडाका, पुण्यातील सायकल यात्रेला मोठा प्रतिसाद 

Published On: 

🕒 1 min read

पुणे – पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेले आदी जीवनावश्यक वस्तू महागल्या असून आता या मुद्द्यावरून कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकारने निर्माण केलेल्या कृत्रिम महागाई विरोधात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली दहा दिवसांचे राज्यव्यापीआंदोलन करण्यात येत असून या निमित्ताने नुकतीच पुण्यात सायकल यात्रा काढण्यात आली.

पुण्याच्या लष्कर भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन विभागीय आयुक्त कार्यालयावर सायकल यात्रा नेण्यात आली. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी नेतृत्व केले.पक्षाचे नेते, सायकल चालवत सहभागी झाले होते. येत्या दहा दिवसात राज्यस्तरावर सायकल यात्रा, पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढी विरोधात सह्यांची मोहीम, महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, आदी मार्गाने मोदी सरकारचा निषेध नोंदविला जाणार आहे .

खाद्यतेले, इंधन, स्वयंपाकाचा गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंच्या भावात वाढ करून मोदी सरकारने अच्छे दिन ऐवजी बुरे दिन आणले असे महिला म्हणू लागल्या आहेत. भाजपला मते दिल्याचा पश्चाताप अनेकांना झाला आहे. सामान्य माणसाचा हा आवाज मांडण्यासाठी पुढील दहा दिवस काँग्रेस् आंदोलनाचा धडाका उडवेल, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!