Share

जुलै महिन्यात ११ दिवस विविध राज्यांत बँक राहणार बंद

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा मध्ये बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या काळामध्ये नागरिकांना बँकिंग सुविधा सुरळीत मिळू शकल्या ते केवळ बँक कर्मचाऱ्यांच्या कामामुळे. मात्र आता अनेक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बँकांना मोठ्या प्रमाणात सलग सुट्ट्या येत आहेत. त्यामुळे देशभरातील बँक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.  जर आपली बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या.

या महिन्यात जुलैमध्ये एकूण 15 दिवस बंद राहील. वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येतील. यामध्ये, येत्या आठवड्यात बहुतेक बँकांच्या सुट्ट्या आहेत. आजपासून म्हणजेच शनिवारीपासून पुढील काही दिवस बँका वेगवेगळ्या राज्यात बंद राहतील.

आज दुसरा शनिवारी असल्याने 10 जुलै रोजी बँकांमध्ये सुट्टी आहे आणि रविवार असल्याने 11 आणि 18 जुलै रोजी बँका बंद राहणार आहे. याशिवाय, सणांमुळे बँका सोमवार ते पुढच्या शनिवारी एकूण 9 दिवस बंद राहतील. दरम्यान, 15 जुलै रोजी सुट्टी नाही. ज्या राज्यांत सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अशाच राज्यात बँका काम करणार नाहीत.

सुट्ट्यांची यादी

आज 10 जुलै दुसरा शनिवार असल्याने बँक बंद राहतील. तर उद्या ११ तारीख रविवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. 12 जुलै सोमवारी कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ,) असल्याने याठिकाणी बँक बंद असेल. 13 जुलै भानु जयंती (शहीद दिवस- जम्मू-काश्मीर, भानु जयंती- सिक्कीम), 14 जुलै द्रुकपा त्शेची (गंगटोक) याठिकाणी बँक बंद असेल. 16 जुलै  हरेला पूजा (देहरादून), 17 जुलै खारची पूजा (अगरताळा, शिलाँग), तर 18 जुलैला रविवार असल्याने सर्वच बँकांना सुट्टी आहे. 19 जुलै गुरु रिम्पोछे थुंगकर त्शेचु  (गंगटोक) येथे बँक बंद असेल. 20 आणि 21 जुलै ईद असल्याने देशभरातील बँक बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बँकेचे काम करण्यासाठी घराबाहेर पडता कॅलेंडर पाहून बाहेर पडावे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!