टीम महाराष्ट्र देशा:औरंगाबाद लोकसभा मतदार सलग चार वेळा संघाचे खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. या पराभवानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा खासदारकीचा मोह अद्यापही सुटलेला नाही. कारण खैरेंच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर त्यांचा नावापुढे अजूनही MP म्हणजे ‘मेंबर ऑफ पार्लीमेट’तसेच ठेवलेले आहे. त्यामुळे निवडणूकीत पराभूत झालेले चंद्रकांत खैरे ट्वीटरवर मात्र अजून खासदारच आहेत.
खैरेच्या वाहनावरही मेंबर ऑफ पार्लमेंट चे स्टिकर असून आजही चंद्रकांत खैरे सर्वत्र फिरत आहेत. खासदार नसतानाही खासदार की चे स्टिकर लावून फिरणारे कदाचित ते एकमेव माजी खासदार असावेत.
1999 पासून सलग चार वेळा औरंगाबाद मधुन चंद्रकांत खैरे लोकसभेवर निवडून गेले वीस वर्षे खासदार राहिलेल्या खैरेंना या वर्षी कडवे आव्हान इम्रातियाज जलील यांनी दिले व खैरेंचा पराभव केला. या पराभवा नंतर खासदार खैरे यांनी आपल्या वाहनावरील खासदार लिहिलेले स्टिकर्स अद्यापही काढलेली नाही. नियमानुसार कोणतेही पद नसताना किंवा संसदेच्या व विधान विधिमंडळाच्या सदस्यतत्वं नसताना वाहनावर एमपी किंवा खासदार लिहिणे चुकीचे आहे.
या संदर्भात खासदार इम्तियाज जलील म्हणाले कि ‘ही जबाबदारी खैरेंची आहे. खासदारकीचे स्टिकर्स काढून टाकवेते, माझ्या वाहनालाही आमदारचे स्टिकर्स होते. मी आमदारकीचा राजिनामा दिला होता तेव्हा मी ते स्टिकर्स तात्काळ काढून टाकले होते. कदाचित खैरे यांना सवय असल्यामूळे त्यांनी ते काढले नसावेते. संसदेचे नियम आहे. तुम्ही एकदा पद सोडले तात्काळ स्टिकर्स काढवे लागते. तुमच्याकडील ओळखपत्र जमा करावे लागते. खैरे यांनी लावलेल्या एमपीचे स्टिकर्स विषयी मला अनेक लोकांनी सांगितले. यासाठी त्यांनीच आता ते काढावेत असा सल्लाही विद्यामान खासदार इम्तियाज जलील यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

