Share

ये बात ! नववर्षाच स्वागत होईल ‘कोरोना लसी’ने ; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : अख्या जगावर सध्या कोरोनाचे सावट आहे. सगळीकडे या घातक आणि जीवघेण्या आजारावर काय उपचार करता येईल याचा शोध घेण्यात येतो आहे.यावर नुकतेच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी खूप मोठी आणि सकारात्मक बातमी दिली आहे.

हर्षवर्धन यांनी म्हटले की “भारतातील काही महत्वाच्या कंपन्यांसह जगभरातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या कोरोना लसींची चाचणी अंतिम टप्प्यात सुरु आहे. येत्या नवीन वर्षाच्या स्वागताला आपण ही लस नक्कीच शोधून काढू” असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

आज हर्षवर्धन मंत्रीगटाच्या २१ व्या बैठकीत बोलत होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, हरदीप सिंह पुरी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान , गेल्या रविवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की, भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी लसीचा पुरवठा करण्याची प्राथमिकता अनेक बाबींवर अवलंबून आहे. यामध्ये त्या देशातील कोरोना संक्रमणाचा धोका, लोकांमध्ये अन्य रोगांचा प्रसार, कोरोनाचे मृत्यूदर आदी बाबी पाहिल्या जातील.

आम्हाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोरोना लस कशी पोहोचेल याची खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले होते. लवकरात लवकर ही लस येवो आणि हे मानवजातीवारचे संकट हद्दपार व्हावे हीचं सगळ्यांची अपेक्षा आहे. दरम्यान याआधी बोलताना संडे संवाद कार्यक्रमात बोलताना डॉ. हर्ष वर्धन यांनी भारतात 400-500 दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना असल्याचं सांगितलं होतं. जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबर अखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!