मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या मोठ्या धावांच्या सामन्यात 4 गडी राखून विजयाची नोंद केली आहे. या विजयासह मुंबई आता गुणांच्या यादीत चौथ्या स्थानावर आली आहे.
चेन्नईकडून 4 गडी गमावून 218 धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईने शेवटच्या चेंडूवर 6 विकेटसाठी 219 धावा देऊन शानदार विजय मिळविला. त्याच्या विजयाचा नायक किरॉन पोलार्ड होता, त्याने फक्त 34 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी खेळली.
????????????????. ????????????????????????????. ????????. ????????????. ????
The Big Man gave a roaring reaction on his return to the dressing room after his heroics on the field! ????????#OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 #Pollard #MIvCSK @KieronPollard55 pic.twitter.com/FmdfsWDWnT
— Mumbai Indians (@mipaltan) May 2, 2021
किरोन पोलार्ड याच्या मैदानावरील शानदार कामगिरीनंतर त्याचे ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी किरोनच्या सहकार्यांनी त्याला मिठी मारली. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून किरोन पोलार्डचा ड्रेसिंग रुममधील स्वागताचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच नेटीझन्सकजून पोलार्डच्या खेळीचं कौतुक होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, उत्तर कोरियाचा इशारा
- ‘या’ कारणामुळे पराभव झाला, धोनीने सांगितले कारण…
- अबकी बार दीदी २०० पार, भाजपची शंभरीत दमछाक !
- बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला तृणमूल कॉंग्रेसचा उमेदवार आघाडीवर
- ‘चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या’


