नवी दिल्ली : 10 दिवसांत पेट्रोल – डिझेल 12 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. 3 मार्च रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 117.39 डॉलरवर गेली आहे. निवडणुकांनंतर किंमती झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. सध्या भाव स्थिर असले तरी येत्या 10 दिवसांत दर 12 रुपयांनी किमती वाढण्याची शक्यता आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळेही कच्च्या तेलाच्या बाजारात विक्रमी उडी घेतली आहे. कच्च्या तेलाची किंमत 3 मार्च रोजी प्रति बॅरल 117.39 डॉलर वर गेली आहे.16 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 12 रुपयांपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे खर्च वसुली करण्याचे नियोजन आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे दर –
दिल्ली: पेट्रोल – ₹95.41 प्रति लिटर; डिझेल – ₹86.67 प्रति लिटर
मुंबई: पेट्रोल – ₹109.98 प्रति लिटर; डिझेल – ₹ 94.14 प्रति लिटर
कोलकाता: पेट्रोल – ₹104.67 प्रति लिटर; डिझेल – ₹ 89.79 प्रति लिटर
चेन्नई: पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹91.43 प्रति लिटर
नोएडा: पेट्रोल – ₹95.51 प्रति लिटर; डिझेल – ₹ 87.01 प्रति लिटर
भोपाळ: पेट्रोल – ₹107.23 प्रति लिटर; डिझेल – ₹90.87 प्रति लिटर
बेंगळुरू: पेट्रोल – ₹100.58 प्रति लिटर; डिझेल – ₹ 85.01 प्रति लिटर
लखनऊ: पेट्रोल – 95.28 रुपये प्रति लिटर, डिझेल – 86.80 रुपये प्रति लिटर
पाटणा: पेट्रोल – 106.48 रुपये प्रति लिटर, डिझेल – 91.63 रुपये प्रति लिटर
चंदीगड: पेट्रोल – ₹94.23 प्रति लिटर; डिझेल – 80.90 रुपये प्रति लिटर
जयपूर: पेट्रोल – 107.02 रुपये प्रति लिटर, डिझेल – 90.66 रुपये प्रति लिटर
तुमच्या शहरातील तेलाची किंमत अशा प्रकारे तपासा
सर्वात पहिल्यांदा इंडियन ऑइल संदेश सेवा अंतर्गत ९२२४९९२२४९ या मोबाईल नंबर वर एसएमएस पाठवावा लागेल. मेसेजमध्ये – RSP पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल. व तुमच्या भागातील RSP कोड जाणून घ्या, इंडियन ऑइलच्या वेबसाइटला भेट देऊन तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

