Share

विधानसभा निवडणुकीत वंचित आणि मनसेला सोबत घेणार : बाळासाहेब थोरात

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यांनतर काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचदरम्यान काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड केली आहे.

विधानसभा निवडणुकीविषयी बोलताना थोरात यांनी वंचितने जरी २८८ जागांसाठी मुलाखतीची तयारी केली असली, तरी पक्ष म्हणून हे सर्व करणे योग्य आहे. पण आम्ही समविचारी, धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांना एकत्रित करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत असे विधान केले. तसेच मनसेबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.”

दरम्यान, कॉंग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी तर नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीतक कदम आणि मुझफ्फर हसन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!