मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने काल या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
यावर आता राष्ट्रवादी युवक आघाडीचे महेबूब शेख यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. ‘साकिनाका येथे घडलेली पीडितेच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेतील संबंधित गुन्हेगारांवर कठोर शासन झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. या भगिनीच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र सामील आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!,’ असं शेख यांनी म्हटलं आहे.
साकिनाका येथे घडलेली पीडितेच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेतील संबंधित गुन्हेगारांवर कठोर शासन झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. या भगिनीच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र सामील आहे.भावपूर्ण श्रद्धांजली!
— Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@MahebubShaikh20) September 11, 2021
‘या’ महिला अधिकारी करणार गुन्ह्याचा तपास !
दरम्यान आता या बलात्कार प्रकरणाचा तपास राज्य गुप्तचर विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या डॅशिंग महिला पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम करणार आहेत. ज्योत्स्ना रासम या २७ वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या होत्या. तसेच त्यांनी मर्दानी या चित्रपटासाठी अभिनेत्री राणी मुखर्जीला ट्रेनिंग दिलेले होते. तसेच सध्या त्या राज्य गुप्तचर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- उद्धव ठाकरेंमध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता; संजय राऊतांचे गौरवोद्गार
- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक, मात्र आम्ही ओबीसी आरक्षण टिकवणारच – वडेट्टीवार
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ‘२ तारखेपासून शिवसेनेचे मंत्री अनिल परबांचे अवैध कार्यालय जमीनदोस्त होणार’, किरीट सोमय्यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

