🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्याला आता काहींनी सुरु विरोध केला आहे. यातच हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध केला आहे.
आपल्या ट्विटरवर “उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,” असा महंत राजू दास यांनी इशारा दिला आहे आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणताय,
‘मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारी शिवसेना हिंदुत्वाच्या मार्गावरून भरकली आहे. आता उद्धव ठाकरे यांना अयोध्येत येऊ देणार नाही.’
अयोध्या
उद्धव ठाकरे के विरोध मे उतरे अयोध्या के साधु संत.हनुमानगढ़ी के महंत राजू दास ने शिवसेना को दी सख्त चेतावनी मुस्लिमो को 5%आरक्षण देने वाली शिवसेना हिंदुत्व के मार्ग से हट गयी है उद्धव को अयोध्याआने नहीं दूंगा @rajudasayodhya @TV9Bharatvarsh pic.twitter.com/SXzK3J6Des pic.twitter.com/xFHYNRsW5M— महंत राजू दास ???? (@mrajudasayodhya) March 1, 2020
काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत अशी घोषणा संजय राऊत यांनी केली होती. महाविकास आघाडी सरकारला १०० दिवसपूर्ती होत असून त्यानिमित्ताने शिवसेना अयोध्येमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे.
याआधी लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेने भाजपची कोंडी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला होता. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर राम मंदिराचा प्रश्न सुटला आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेची कोंडी होत आहे. निवडणुका झाल्यावर अयोध्येला जाण्याचे ठाकरे यांनी जाहीर केले होते.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

