Share

आम्ही लवकरचं सत्ता स्थापन करणार, शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा – पाटील

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणूक युतीमध्ये लढवलेले शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदाविषयी वाद सुरु आहे. शिवसेनाला सत्तेत अर्धा हिस्सा पाहिजे तर भाजप समसमान वाटप करण्यास तयार नाही. दोनही पक्षाचे नेते यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्ही लवकरचं सत्ता स्थापन करणार आहोत, तसेच आम्हाला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतीक्षा आहे असंही ते म्हणाले आहेत.

या बैठकीनंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात महायुतीचेचं सरकार येणार आहे. कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते असं ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्रिपदाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री असणार आहेत अशी माहितीही मुनगंटीवरांनी दिली आहे.

दरम्यान, या बैठकीला भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा सुटतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191682295125594112?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191681869722472449?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191680586844274688?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!