टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे ही मेगा भरती झाली आहे. या भरतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये येण्यास कोणताही दबाव टाकला जात नाही. भाजपाच्या चांगल्या कार्यपद्धतीला पाहून सर्व नेते आमच्या गोटात दाखल होत आहे. आता बहुमताचे सर्व विक्रम मोडीत काढणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘काही भाजपच्या जागा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत, तर काही शिवसेनेच्या जागा भाजपकडे येऊ शकतात, अशी जागांची अदलाबदल करण्याचा निर्णयही १५ दिवसांत घेऊन जागावाटप निश्चित करण्यात येणार असल्याच त्यांनी सांगितले.
दरम्यान, गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह खा. रणजितसिंह निंबाळकर, मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रवेश करणाऱ्या नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी होती.
‘भाजप-आणि शिवसेना आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत’
ज्या पक्षात जनतेच्या विकासाचे हित असेल तिथे मी जाणार – शिवेंद्रराजे भोसले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

