Share

ज्या पक्षात जनतेच्या विकासाचे हित असेल तिथे मी जाणार – शिवेंद्रराजे भोसले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :  मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाला रामराम करून भाजपात प्रवेश घेताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. स्वतःच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर शिवेंद्रराजे यांनी सूचक विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनतर राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे. चित्रा वाघ यादेखील लवकर भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलेले जात आहे.

इतकेच नव्हे तर साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमार शिवेंद्रराजे भोसले हे देखील भजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले आहे. विशेष म्हणजे शिवेंद्रराजे यांनी स्वतःच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे. माझ्या मतदारसंघातील हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी असणार, असे त्यांनी म्हंटले.  इतकेच नव्हे तर कोणत्याही प्रवेशाबाबत मी आता काहीही सांगणार नाही ज्या पक्षामध्ये जनतेच्या विकासाचे हित असेल आणि जो पक्ष मोठा असेल त्या पक्षात मी प्रवेश करणार. जनता जे ठरवेल, त्यावर माझे पाऊल असेल, असेही त्यांनी म्हंटले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!