Share

महाराष्ट्र सदन प्रकरणात आमच्यावर खोटेनाटे आरोप केले; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा सर्वात मोठा निर्णय दिला. यानंतर धगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या प्रकरणात बिल्डरसह आम्हा सर्वांना एक नवा पैसा देखील मिळालेला नाही. उलट महाराष्ट्र सदनाची सर्वानीच वाह वाह केली आहे. मी जोरात बोलतो, योग्य बाजू मांडतो त्याचा विरोधकांना त्रास होत असेल त्यामुळेच ते माझ्यावर खोटे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र ‘सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं’असं म्हणत त्यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर समाधान व्यक्त केलं आहे. या प्रकरणात बिल्डरसह आम्हा सर्वांना एक नवा पैसा देखील मिळालेला नाही. उलट महाराष्ट्र सदनाची सर्वानीच वाह वाह केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. ‘महाराष्ट्र सदन प्रकरणात आमच्यावर खोटेनाटे आरोप करुन आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे’, असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!