🕒 1 min read
मुंबई: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषय मांडले. राजकीय आरक्षण शिल्लक ठेवायचे असेल तर कोणी न्यायालयात जाऊ नये, अशी विनंती विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. तसेच आयोगाने कामाला सुरुवात केली असून पुढील ६ महिन्यात इम्पिरिकल डेटा तयार केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. मुंबईतील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत वडेट्टीवार म्हणाले की, उद्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक असणार आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणूकबाबतही चर्चा होईल. अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेवर सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही. राज्यपाल महोदय अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी आता वेळ देतील. तसेच सध्याच्या राजकारणावर बोलताना महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येऊन पुढे गेलो पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
IPL 2022: पंजाब किंग्जने वाढवली ताकद; ‘हा’ प्रशिक्षक बनवणार फलंदाजीची क्रमवारी घातक
-
“लडेंगे और जितेंगे भी…“, दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
-
शेतकऱ्याच्या मुलाच्या बँक अकाऊंटमधून तब्बल 300 कोटींचा व्यवहार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
