Share

शिवसेनेची लायकी काय हे आम्हाला माहिती होतं – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.

बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेने देखील आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळालं. कित्येक मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. अशातच शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून भाजपला चिमटा काढत असलेले पाहायला मिळालं.

भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत यावरून संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. “संजय राऊतांचा गजनी झालाय ते पराभव विसरतात, शिवसेनेचा पराभव जसा बाहेर होतो, तसा महाराष्ट्रात होण्यास वेळ लागणार नाही, याची मला खात्री आहे,” असा टोला निलेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांना लगावलाय.

शिवसेनेची लायकी काय होती हे आम्हाला माहिती होतं. संजय राऊत विसरले होते, गोव्यामध्ये ही तसेच झालं होतं. गोव्यामध्ये सर्व मिळून 900 मते शिवसेनेला मिळाली होती, असा घणाघात देखील त्यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!