Share

‘औरंगाबादचं नाव बदलण्याने काय साध्य होणार, अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं’ – कोल्हे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर झालं पाहिजे ही गेल्या 30 वर्षांपासूनची मागणी आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक तर याच मुद्द्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून लढवली जात आहे. शिवसेना-भाजपची राज्यात दोनदा सत्ता येऊनही त्यांनी या शहराचं नाव बदललं नाही. त्यानंतर मनसेनंही औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उचलून धरला. आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीत त्यांचे मित्र असलेल्या शिवसेनेच्या भूमेकेच्या अगदी विरोधी भूमिका मांडली आहे.

औरंगाबाद या शहराचा उल्लेख संभाजीनगरच व्हायला हवा. पण राज्यकर्ता म्हणून सर्वांगिण विकास व्हायला हवा. आपली अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं, नाव बदलण्याने काय साध्य होणार आहे? अस्मितेच्या प्रश्नाने मराठवाड्याचे प्रश्न थांबणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत”, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली. मुंबई पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते

अमोल कोल्हे यांनी यावेळी विविध विषयांवर आपलं मत मांडलं. त्यांना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारला असता “मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. या विषयी सरकार सातत्याने भूमिका मांडतं आहे. एबीसी आरक्षणाबाबात संसदेत जनगणनेत वेगळा कॉलम असायला हवा. जोपर्यंत संख्या समजणार नाही तोपर्यंत काही ठरवता येणार नाही. सध्या 52 टक्के आरक्षणापैकी 27 टक्केच आरक्षण आहे, त्यामुळे जनगणना महत्वाची आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

दरम्यान, औरंगाबाद शहर पुरातन आणि इतिहासाचं वरदान असलेलं शहर आहे. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर-ए-अंबरी अशा एक ना अनेक वास्तू या शहराला शशोभित करतात. निवडणुका आल्या की ऐतिहासिक औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्याची मागणी राजकीय व्यासपीठावरुन नेहमीच सुरु होते. गेली 30 वर्ष हा मुद्दा शिवसेना-भाजप प्रतिष्ठेचा बनवत महापालिका निवडणुकीत प्रचार करत सत्तेत आली. मात्र आता शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेल्याने मनसे हा मुद्दा काबीज करत औरंगाबादकरांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. तर अमोल कोल्हेंच्या या भूमिकेने महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का ? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!