Share

‘भविष्यात काय होईल, हे आता पाहावं लागेल’, संजय राऊतांचा खोचक टोला

Published On: 

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत यांनी लखीमपूर घटनेवर देखील भाष्य केले. याविषयी बोलत असतांना ते म्हणाले की,’उत्तर प्रदेशमध्ये ज्या काँग्रेसचं अस्तित्व संपल होतं, तिथे प्रियांकांच्या समर्थनार्थ मशाल मोर्चे निघत आहेत. ही एकप्रकारची जागरुकता होत असून लोकं जागी होत असल्याचं लक्षात येतेय’. तसेच ‘भविष्यात काय होईल, हे आता पाहाव लागेल’ असेही ते म्हणाले.

पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेची तुलना राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालियनवाला बाग घटनेशी केली होती, ती तुलना योग्यच आहे. जनतेच्या संतापाला वाट मोकळी करुन देण हे विरोधकांचे काम आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी लखीमपूरला जाणार आहेत, त्यांनाही अडवले जाईल. तसेच राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटिस बजाविल्याची माझी माहिती आहे’, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. लोकशाहीसंदर्भात आवाज जो उठवतो, त्याची नाकेबंदी केली जाते, देशद्रोही ठरविले जाते, अशा प्रकारचा अवलंब होत असेल तर देशामध्ये नव्या प्रकारली गुलामगिरी सुरु झाली, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर टीकास्त्रांचा प्रहार केला.

दरम्यान, कम्युनिस्ट नेते कन्हैया कुमार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ते आता मुख्य प्रवाहात आलेले आहेत. कन्हैया कुमार यांनी काल भेट घेतली, त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा केली, यावेळी बोलतांना असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!