Share

‘एका हातात धर्मग्रंथ तर दुसऱ्या हातात संविधान हवं’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले आहे. 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरु आहे. फादर दिब्रिटो हे त्याचे अध्यक्ष आहेत. मोठ्या उत्साहात सकाळी ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सध्याच्या विविधी मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या एका हातात त्याचा धर्मग्रंथ आणि त्याच्या दुसऱ्या हातात देशाचं संविधान असायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी एकदा जर्मनीला गेलो होतो. तिथल्या नागरिकांना मी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की होय एक काळ असा होता की आम्ही हिटलरच्या धुंदीत होतो. तशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते. तशीच झडप आपल्यासमोरही आली आहे” असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली.

दरम्यान, मला गौतम बुद्ध वाचून आयुष्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळे आपण प्रगल्भ होतो. आपल्या वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. अनेक पालकांना आजच्या घडीला वाटतं की इंग्रजी ही धनाची भाषा आहे. ती धनाची भाषा असेल पण लक्षात ठेवा मराठी ही मनाची भाषा आहे, असे दिब्रेटो म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!