Share

‘राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय पण आता…’ ; शरद पवारांनी केला खुलासा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : विधान परिषदेच्या १२ आमदारांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची भेटही घेतली आहे. मात्र, या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळले गेल्याची चर्चा आहे. त्यावरून राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

दरम्यान यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. या विषयी आज पुण्यामध्ये बोलताना पवार म्हणाले कि, ‘राजू शेट्टी यांचं सहकार कृषीक्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊनच आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत दिले होते. पण पुढे काय झालं माहित नाही. राज्यपालांकडे तो विषय प्रलंबित आहे. आम्ही तरी त्यांचं नाव यादीतून वगळलेलं नाही. राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, पण आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केले आहेत, यावर मी बोलणार नाही.’ असे स्पष्ट मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान राजू शेट्टी यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीवर घणाघाती हल्ला चढवला होता. आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचं आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो, असं शेट्टी म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!