🕒 1 min read
पुणे : गेल्या दीड-दोन वर्षात कोरोनामुळे सगळंच झाकोळलं गेलं आहे, तरीही माणसाने माणसाला केलेल्या मदतीमुळे समाज उभा राहू शकला आहे. आपल्या जगण्यामध्ये आनंदाची पखरण करणाऱ्या सणासुदीच्या काळात एकमेकांना साथ देऊया, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील व्यापाऱ्यांना पत्राद्वारे केले आहे.
चंद्रकांत पाटलांच्या या आवाहनाला व्यापारी बांधवांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनामुळे सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. दुसऱ्या लाटेत तर अनेकांवर बेरोजगारीची मोठी संकटं कोसळली, तर व्यापाऱ्यांनाही अनेक संकटांचा सामना करावा लागला. आता यातून आपण बाहेर पडत आहोत. अर्थचक्र पुन्हा सुरू होत आहे. त्यातच आगामी काळ हा सणासुदीचा काळ असल्याने, व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत शक्य असल्यास खरेदीमध्ये सवलत द्यावी, असे पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याला शक्य त्या प्रमाणात खरेदीवर सवलत देण्याचे मान्यही केले आहे. चंद्रकांत पाटलांच्या या आवाहनामुळे कोथरुडकरांना सणासुदीच्या काळात मोलाची मदत मिळणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री महोदय, हे धक्कादायक चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे!’
- हुबेहुब, सेम टू सेम ; कोण आहेत ‘त्या’ दोघीं
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश


