🕒 1 min read
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.
ही पोटनिवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ दोन तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. भाजपाने परिचारक गट व आवताडे गटाचे मनोमिलन केल्यामूळे एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणूकीत रंग भरले आहेत.
निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली असून विविध नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पंढरपूरच्या दौऱ्यावर असून आज एका दिवसात ते तब्बल ६ प्रचारसभा घेतल्या आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. पंढरपुरात देखील तसेच वातावरण आज पाहायला मिळत होते. फडणवीस सभेला संबोधित करायच्या अगोदरच पावसाचे वातावरण तयार झाले होते. यावेळी खासदार रणजित नाईक निंबाळकर त्यांच्या भाषणात म्हणाले कि ‘देवेंद्रजी आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे.’ याला उत्तर देत देवेंद्र फाणवीस म्हणाले कि ‘आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही.’ फडणवीसांच्या या वक्तव्यावर उपस्थितीतांनी चांगलीच दाद दिल्याचे देखील पाहायला मिळाली.
दरम्यान, १८ऑक्टोबर २०१९ रोजी सातारा येथे भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा प्रचंड गाजली होती. व त्या सभेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले होते. यामुळे फडणवीसांनी आजचे हे वक्तव्य हे शरद पवारांना टोला लगवण्यासाठीच केले असल्याची चर्चा सध्या राजकीय वातावरणात रंगत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींसाठी एकही जागा शिल्लक असणार नाही – फडणवीस
- कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक! संत, महंतांसह ४०० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
- २५ जणांचा अत्यंविधी एकाच सरणावर करण्याची वेळ येईल, धनंजय मुंडेंचा इशारा
- कार्यालयांमध्ये तक्रार समिती स्थापन करावीच लागणार! अन्यथा होणार कारवाई…
- रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्यासाठी दलित बहुजनांची एकजूट करणार – आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
