Share

२५ जणांचा अत्यंविधी एकाच सरणावर करण्याची वेळ येईल, धनंजय मुंडेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

बीड : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढ सुरूच आहे. गेल्यावर्षी झालेल्या बिकट परिस्थितीतून कोणताही धडा न घेतल्याने महाराष्ट्रात सध्या आरोग्य आणीबाणी असल्यासारखे चित्र आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड मिळत नाहीयेत,इंजक्शनचा देखील तुटवडा आहे, ऑक्सिजन देखील काही ठिकाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. यातच कोणतीही ठोस उपाययोजना न करता आता सरळ लॉकडाऊन करण्याची तयारी राज्यसरकारने सुरु केली आहे.

अशा सर्व परिस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं असल्याने ससून रुग्णालयाच्या शवागृहातून मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी होत असताना पाहायला मिळत होते. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. रुग्णसंख्येसोबत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणंही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आलेला सध्या पाहायला मिळत आहे.

‘रुग्ण वाढतायेत, लॉकडाऊन शिवाय आता मार्ग नाही. 9 जणांचा अंत्यविधी एकाच सरणावर झाला. उद्या २५ जणांचा एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ येईल. त्यामुळे लॉकडाऊन हे केलंच पाहिजे’, असं मत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडलं. मुंडे यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

कोरोना काळात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडलो. प्रशासन म्हणून आपण काळजी घेतली नाही. जनतेने तर काळजी घेतलीच नाही तर परिस्थिती गंभीर होईल याचा अंदाज मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला होता. आता सर्व झटकून कामाला लागा, असं पालकमंत्री धनंजय मुंडे अधिकाऱ्यांना म्हणाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. जिल्ह्यात ऑक्सिजनचे २५०० बेड , नव्याने एक हजार ऑक्सिजनचे बेड तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेड कमी पडले तर खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, अशा सूचना मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!