🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बिहार निवडणूक एकत्र लढण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती, आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक झाली होती, त्यानंतर ही बैठक झाली. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
शिवसेनेने बिहार निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. पक्षाने आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला, दोन्ही पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने २२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवेसेना नेते संजय राऊत प्रचार करतील, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. बिहार निवडणूकीत कुणासोबत युती करायची याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर ‘बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात पाटन्याला जाणार आहे. त्यावेळी यावर चर्चा होईल’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही असं करणार आहात का? असा प्रश्न विचारला असता आम्ही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवू एवढी आमची ताकद नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं. खरंतर, महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांनी ऐतिहासिक निर्णय घेत एकत्र सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजप शिवसेनेवर नाराज आहे. हीच नाराजी आता बिहार निवडणुकांमध्येही दिसते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.
तर दुसरीकडे यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर शिवसेना आणि राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला आहे. ‘बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत… महाराष्ट्रात बुडण्याआधी बिहारमध्ये प्रॅक्टिस करून घ्या’ असा घणाघाती टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत…
महाराष्ट्रात बुडण्याआधी बिहारमध्ये प्रॅक्टिस करून घ्या… pic.twitter.com/JQobw8wXgv— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 13, 2020
महत्वाच्या बातम्या-
- बेजबाबदार मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिरसह ३८ जण कोर्टात
- गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास का होतोय ?
- धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित,टोपेंची कबुली
- कृषी कायद्यांमुळे सामान्यशेतकऱ्यांचा फायदाच होणार – चंद्रकांत पाटील
- महाराष्ट्रात बुडण्याआधी बिहारमध्ये प्रॅक्टिस करून घ्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
