Share

‘मराठा आरक्षणावरून स्वार्थी राजकारण, छत्रपती संभाजीराजेंची भूमिका आम्हाला मान्य नाही’

Published On: 

लातूर: राज्यभरात सर्वत्र आरक्षणावरून आंदोलने तसेच मोर्चे काढण्यात येत आहेत. राज्यातले राजकारण देखील याच आरक्षणाभोवती फिरताना दिसत आहे. अशातच मराठा आरक्षणावरून स्वार्थी राजकारण सुरु असल्याचे वक्तव्य छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी एका पत्रकार परिषदेत केले आहे. तसेच छत्रपती संभाजीराजे यांची देखील भूमिका अमान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी ५८ मूक मोर्चे काढून काहीही फायदा झाला नाही. पण, समाजाचा वापर करून कोणी खासदारकी, कोणी आमदारकी तर कोणी महामंडळे मिळवून विश्वासघात केला आहे. स्वार्थी राजकारण सुरू आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही. आरक्षणाची भूमिका बाजूला ठेवून राजे आज सारथी संस्थेला, महामंडळाला निधीची मागणी करीत आहेत. मूक आंदोलन करीत आहेत. मराठा समाजासाठी आता ठोक आंदोलन असेल. लवकरच महाराष्ट्रात आरक्षणासाठी उद्रेक दिसेल, अशी माहिती अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.

जावळे म्हणाले, आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे. आता काही स्वयंघोषित नेते पुढे पुढे करीत आहेत. छावा संघटनेची पहिल्यापासूनच ठोक भूमिका राहिली आहे. छत्रपती संभाजीराजे यांना आमचा विरोध नाही. पण, त्यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध आहे. ते आरक्षणावर बोलत नाहीत. पण, सारथी संस्थेला व महामंडळाला निधी देण्याची भाषा बोलत आहेत. राजेंनी आमच्यासारखी ठोक भूमिका घ्यावी. आमच्यासाठी शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत. दुसरे राजे नाहीत, असेही जावळे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!