Share

जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रियेला मिळणार गती, सर्वपक्षीय बैठीकडे अवघ्या देशाचे असणार लक्ष

Published On: 

🕒 1 min read

श्रीनगर : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांना २४ जून रोजी दिल्लीत चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.जम्मू आणि काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रियेला गती देण्यासाठी केंद्राने १४ राजकीय पक्षाच्या नेत्यांना बैठकीचे आमंत्रण दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर राजकीय पक्षांशी हा पहिलाच संवाद आहे. या पार्श्वभूमीवर गुपकार आघाडीची आज एक महत्वाची बैठक श्रीनगर येथे झाली, ज्यामध्ये ते 24 जून रोजी पंतप्रधानांसह सर्वपक्षीय बैठकीत भाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की त्या चर्चेच्या विरोधात नाहीत. पंतप्रधानांसमोर राजकीय कैद्यांची सुटका करण्याचा मुद्दा उपस्थित केला जाईल.तसेच पाकिस्तानसोबत पुन्हा चर्चा करण्याचा मुद्दा देखील मांडला जाईल असे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात फारूक अब्दुल्ला म्हणाले की आम्ही बैठकीत भाग घेऊ आणि पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडू. मेहबूबा जी, तारिगामी जी आणि मी जाऊन आमची बाजू त्यांच्यासमोर मांडू. दरम्यान, याच मुद्द्यावर दिल्लीत आज कॉंग्रेस कमिटीची बैठक होणार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. या बैठकीला गुलाम नबी आझाद, करण सिंह, पी चिदंबरम आणि जम्मू-काश्मीरमधील पक्षाचे प्रमुख गुलाम अहमद मीर उपस्थित असतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!