Share

महाराष्ट्रासाठी 12 कोटी डोस एकरकमी घेण्याची तयारी, मात्र पंतप्रधानांनी… – मुख्यमंत्री ठाकरे

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चिंताजनकरित्या वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत ब्रेक दि चेन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

‘राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात आहे. दुर्दैवाने सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात आहेत.महाराष्ट्रातील 6 कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. पण पंतप्रधानांना विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू,’ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करतोय. 18 म्हटलं तर युवा आलाच, आणि युवा आले तर उत्साह आलाच. कोविन ऍप काल क्रॅश झालं. थोडं मार्गी लागेपर्यंत असं होणार. मी पंतप्रधानांना विनंती केली आहे, राज्यांना आपआपली ऍपची परवानगी द्या, ते ऍप केंद्राशी कनेक्ट करा. असं झालं तर सोय होईल. आता ऍपवर नोंदणी केल्यानंतर माहिती मिळेल, त्या वेळेप्रमाणे केंद्रावर पोहोचा,’ असं आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरेंनी केलंय.

उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यासाठी काही मोठी घोषणा करणार का ? याची उत्सुकता लागली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर आवश्यक लसींच्या साठ्याअभावी लसीकरण सुरु करण्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असमर्थता दर्शवली होती. मात्र, आता महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून लसीकरण सुरु केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!