Share

‘एकही झाड न तोडता हे स्मारक कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : ” एक विषय काही दिवसांपासून सतत चर्चेला येत आहे, स्मारकासाठी काही झाडं तोडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बनवणार आहोत अशा चर्चा सुरू असताना महापौर म्हणून माझा खुलासा असा आहे की एकही झाड न तोडता हे स्मारक कसं होईल त्या करता आम्ही प्रयत्नशील आहे नव्हे त्या पद्धतीनेच आम्ही स्मारक बनवू. असे स्पष्टीकरण औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले आहे.

दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवसेना कमिशनखोरी करत आहे. राज्यसरकार बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी ढोंगीपणा करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. तसेच ठाकरे स्मारकासाठी औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानातील १००० झाडे कापण्याचा घाट घातला असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

शिवसेनेची सत्ता सलेल्या औरंगाबाद पालिकेचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. राज्यात शिवसेनेचे सरकार येताच प्रबोधनकार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानातील हजारो झाडांची कत्तल केली जात आहेत. त्यामुळे मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रोच्या कार शेड प्रकरणी आक्रमक असलेली शिवसेना शांत का ? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी विचारला आहे.

औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यान हे पर्यावरणप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे. शहरातील सर्वात शुद्ध हवा इथे आहे. शहरातील लोक या उद्यानाला ऑक्सिजन हब म्हणतात. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी परिसरातील झाडं आणि जैवविविधता धोक्यात आली आहे. तसेच आज दिसतंय ते या उद्यानाचं निम्मं राहिलेलं वैभव आहे. या उद्यानाची जागा सिडकोकडून मनपाच्या ताब्यात आली आणि त्यानंतर या उद्यानातील 443 झाडं प्रस्तावीत आहेत.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीदेखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ” शिवसेनेने आतापर्यंत लोकहितासाठी निर्णय घेतले आहेत. कमिशन खाणे किवा घेने हा वाक्यप्रचार भाजपलाच सुट होतो. आम्ही लोकहिताचा कामासाठी नेहमी अग्रेसर असतो. यात कधीही देवाण घेवान केली जात नाही. भाजपला कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. आम्ही झाडे तोडणारच नाहीये. अमला जे काही निरन=मन करायचे आहे ते झाडांना हात न लावता निर्माण करायचे हे . याबाबत आम्ही झाडांना हातही लावणार नाही.”

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1203636166051815427?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1203626840230748160?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!