Share

उद्धवसाहेब…! आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय – संजय राऊत

Published On: 

मुंबई : उद्धव ठाकरेंकडे आम्ही तुमच्याकडे उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. पक्षाचा विचार आणि सरकार एकत्र चाललं पाहिजे. सत्तेवर असल्याचं भान ठेवून काम करावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानेच कोरोना संकटावर मात करू शकतोय. पूर्ण सत्ता जेव्हा शिवसेनेची येईल, सेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेव्हाच स्वप्न पूर्ण होईल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनबाबतच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागल्याचंही राऊत म्हणाले.

मी शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणारच – उद्धव ठाकरे

दरम्यान, मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. वादळामागूनी वादळं आली तरी शिवसेनाच एक वादळ आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवन येथे शिवसेने च्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

तेलंगणात मराठी वाघाची छाप ! मराठमोळे अधिकारी महेश भागवतांची अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!