प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करण्याचा मराठी माणसांचा इतिहास आहे. त्यामुळेच आपले राज्य ‘महा’राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये आणखी एका मराठी अधिकाऱ्याने पुढचे पाऊल टाकले आहे. तेलंगणा पोलीस दलात आपल्या कार्यातून छाप पाडणारे रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांची तेलंगणा राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे.
होय… मी अजितदादांचा निकटवर्तीय, वरिष्ठ पातळीवर ‘पावर’फुल ; मिटकरींची डरकाळी
महेश भागवत 1995 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीचे. त्यांचे आईवडील शिक्षक. पाथर्डीच्या विद्या मंदिरात शिक्षण घेतलेल्या भागवतांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरींग केलं. सध्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील अनेक अधिकार्यांचे ‘आयडॉल’ ठरलेले मराठमोळे भागवत त्यांच्या कर्तव्यकठोर भूमिकेमुळे जगभर दखलपात्र ठरले आहेत. त्यांनी मानवी तस्करीच्या विरूद्ध जो लढा उभारला त्याची दखल अमेरिकेलाही घ्यावी लागली. अमेरिकेच्या गृहखात्याने त्यांना ‘2017 ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हिरोज अॅवार्ड’ हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला आहे. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा, असे कार्य महेश भागवत यांचे आहे. तेलंगाणा राज्यातील ‘अन्नदाता’ अशी त्यांची ओळख आहे.
सर्वपक्षीय बैठकीपूर्वी मानापमान नाट्य; निमंत्रण न मिळाल्याने ‘हे’ पक्ष रुसले
अहमदनगर जिल्ह्यातील मुळचे पाथर्डीचे असलेले महेश भागवत सध्या हैदराबादच्या रचकोंडा पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त आहेत. त्यांनी मानवी तस्करी रोखण्यासंदर्भात खूप मोठे योगदान दिले आहे. अनेक लहान मुले आणि महिलांची या जाळ्यातून सुटका केली आहे. याच बरोबर सामाजिक कार्यातदेखील त्यांचा नेहमीच सहभाग राहिला आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीकोणातून त्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेली She team एक उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यामुळे शहरात महिलांविरोधात होणाऱ्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यात यश आले आहे. याचबरोबर लॉकडाऊन काळात भागवत यांनी अनेक गरजूंना अन्न वाटप केले. तसेच कित्येक स्थलांतरीत नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यासोबतच पोलीस दलाची उत्कृष्ट कार्याची दखल घेत तेलंगणा सरकारने त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे.

