Share

मी शिवसैनिकाला पंतप्रधान बनवणारच – उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई : मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. वादळामागूनी वादळं आली तरी शिवसेनाच एक वादळ आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवन येथे शिवसेने च्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

.बापरे …लॉकडाउनच्या काळात लॅपटॉप, स्मार्टफोनच्या खरेदीत ३० टक्के वाढ

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

आज कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. शिवसेनाच एक वादळ आहे. अशी कितीही वादळे आली तरी हे भगवे वादळ कायम राहणार आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचं कवच आहे. शिवसैनिकांचे कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, उद्धव ठाकरे म्हणालेत.

पुण्यातील दुकानदार, व्यापारी पवारांच्या भेटीला, आपल्या अडचणींचा वाचला पाढा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!