मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नव्या वादाला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला असून या भूमिकेवरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. असे असतांनाच आता अमोल कोल्हेंच्या भूमिकेला आमचा विरोध नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले की,’शरद पोंक्षे नथुराम गोडसेची भूमिका त्या विचारांच्या प्रचारासाठी साकारतात तर अमोल कोल्हे कलाकार म्हणून कलेशी असलेल्या बांधिलकीतून ही भूमिका साकारत आहेत, हा त्यातील मुलभूत फरक आहे. त्यामुळे त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारण्याला आमचा विरोध नाही.’ तसेच अमोल कोल्हे आपल्या कलेच्या बांधिलकीनुसार ही भूमिका साकारत असले तरी त्यांची वैचारिक बांधिलकी ही राष्ट्रवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेशीच आहे, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही, असेही पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील अमोल कोल्हेंची बाजू घेतली असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले आहेत की,’खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हानात्मक भुमिका साकारली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली असेल याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही. रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची साकारलेली भुमिका आठवा प्रत्यक्षात मात्र ते रामभक्त होते हे वास्तव आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- अखेर कालीचरण महाराज पोलिसांच्या ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ
- “झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?”, मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- “काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाही”, अमर ज्योती विझवण्यावरून राहुल गांधींची टीका
- “दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणात सेवन केल्यास औषधासारखी असते”, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचा अजब दावा
- पंतप्रधान मोदी ठरले आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय नेते; अतुल भातखळकरांनी केले कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

