Share

बच्चू कडू अॅक्शन मोडमध्ये, वेषांतर करून कृषी केंद्रावर नजर ठेवण्याचे दिले आदेश

Published On: 

अमरावती : सध्या पेरणीचा हंगाम असल्याने कृषी केंद्रात जास्त भावाने बियाणे, खते विकण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नकली बियाण्यांचाही शिरकाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी केंद्रावर खरेदीसाठी जाणा-या नागरिकांत सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. त्यामुळे कृषी विभागाने वेषांतर करून कृषी केंद्रांवर पाळत ठेवावी व वेळोवेळी तपासणी करावी. कुणीही दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहे.

राज्यमंत्री कडू यांनी नुकतेच चांदूर बाजार तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार अभिजित जगताप, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बोरखडे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

वेल डन महाराष्ट्र ! हे शक्य झालं फक्त आणि फक्त राज्यातील जनतेच्या संयमामुळे – जयंत पाटील

दरम्यान, चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे कोरोनाचा रूग्ण आढळला. या पार्श्वभूमीवर लक्षणे आढळणा-या व्यक्तींच्या तपासण्यांची संख्या वाढवावी व ग्रामीण रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी चांदूर बाजार येथे नुकतेच दिले.

राज्यमंत्री कडू म्हणाले की, सध्या पावसाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्यात सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामीण रूग्णालयात वेगळा कक्ष उभारून मनुष्यबळ वाढवावे. आवश्यक मनुष्यबळ व साहित्याचा प्रस्ताव द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यानिमित्त आरोग्य सुविधा व इतर कामांचाही आढावा त्यांनी घेतला.

ठाकरेंचा करिष्मा ! कोरोनाच्या काळात १६००० कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!