नवी दिल्ली : चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही आहे. दुसरीकडे या संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
एकाबाजूला हे सर्व घडत असताना भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या दरम्यान चीनची ग्रेट वॉल मोटार कंपनीने बुधवारी महाराष्ट्र सरकारसोबत करार केला आहे. ज्यादिवशी भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष सुरु होती त्याचदिवशी हा करार महाराष्ट्रात करण्यात आला.
लोकमतने दिलेल्या बातमीनुसार, ग्रेट वॉल मोटार कंपनीने महाराष्ट्र सरकारसोबत १ अरब डॉलर(७,६०० कोटी) ची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे. कंपनीने जानेवारी महिन्यात जनरल मोटर्सकडून पुण्याच्या तळेगावजवळ प्लांटचं अधिग्रहण केले होते. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली ऑटो एक्सपोमधून भारताच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र सरकारशी केलेल्या करारानुसार तळेगाव पुणे येथे कंपनी अत्याधुनिक प्लांट तयार करणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वोकल फॉर लोकल याचं आवाहन केले, त्यानंतर देशात परदेशी वस्तू वापराबद्दल राष्ट्रवाद निर्माण झाला. २ दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे एका बाजूला देशात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सरकार त्याच चीनमधील कंपन्यांना पायघड्या घालत आहे. सोशल मिडीयावर या वृत्ताबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
सैराट मुळे चर्चेत आलेल्या करमाळ्याच्या कमला भवानीच्या मंदिराला आहे मोठा ऐतिहासिक वारसा
WhatsApp- चॅटींगसाठी व्होडाफोन व व्हाटसअॅप एकत्र
भारत-चीन सीमेवर चकमक; एक अधिकारी, भारताचे दोन जवान शहीद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

