औरंगाबाद : जलशुद्धीकरण प्लांट वरुन शेंद्रा एमआयडीसीला पाईप लाईन टाकून पुरवले जाते, मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या खोडेगांवाला पाणी मिळत नाही. राज्यमंत्री बच्चु कडू यांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रीय पेयजल योजना मंजुर झाली मात्र पाणी आले नाही. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही गावातील महिलांना डोक्यावर पाण्याचे हांडे घेऊन वणवन करावी लागत आहे.
औरंगाबाद तालुक्यातील खोडेगाव हे राज्यमंत्री बच्चु कडू यांनी दत्तक घेतले आहे. खोडेगावाच्या हाकेच्या अंतरावर जलशुद्धीकरण प्लांट आहे. जवळ असलेल्या बेंबळ्याचीवाडी येथील धरणाच्या आतील बाजुस एक विहीर तर धरणाच्या खालच्या भागात दुसरी विहीर खोदुन पुर्ण झालेली आहे. पण या दोन्ही विहीरीचे पाणी गावातील पाण्याच्या टाकीत न अल्यामुळे शासनाने कोटी रुपये खर्च करुनही काहीच फायदा झाला नाही. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूकीतील नवनिर्वाचित सदस्यांनी या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई करावी असे निवेदन पालकमंत्री सुभाष देसाई यांना दिले.
या त्रासाला कंटाळून जलशुध्दीकरण करणाऱ्या टाकीमधुन २५ फेब्रुवारी पर्यंत पाणी उपलब्ध करुण दिले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य अमोल ढगे, तेजीराम सरोसे, पुष्पाबाई ढगे, कविता संदिप वीर यांनी दिला आहे. या निवेदनात २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येईल असे म्हटले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात खोडेगाव येथील जलशुद्धीकरण मधुन पाण्याचे टँकर भरण्यासाठी परवानगी तहसीलदार देत असतात. पंरतु हाकेच्या अतंरावर असलेल्या खोडेगाव येथील नागरीकांना पाणी मिळत नसल्यामुळे नागरीक ञस्त झाले आहेत. पैठणच्या धरणातुन पाईप लाईन टाकुन खोडेगाव येथे पाणी शुध्द करुन शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये पाईपलाईन टाकुन पाणी पुरवले जाते. मात्र गावाला पाणी मिळत नाही.
महत्वाच्या बातम्या
- नांदेडमध्ये पेट्रोलच्या दराने ओलांडली शंभरी; परभणीत पुन्हा उडाला पेट्रोलचा भडका
- ‘जात महत्त्वाची नसून…’, रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत, कलाकारांनी देखील केलं लाईक
- आयपीएलच्या लिलावानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूला पडलेला प्रश्न, १५ कोटी म्हणजे किती?
- गारपिटीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या : आ. संतोष दानवे
- लिलावात बोली लागल्यानंतर इंग्लंडच्या ‘या’ महिला खेळाडूने केले अर्जुनचे कौतुक

