नांदेड : नांदेड जिल्ह्यातील धर्माबादेत पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. धर्माबादमध्ये वाहनचालकांना एक लिटर पेट्रोलसाठी १०० रुपये २९ पैसे मोजावे लागत आहे. तर डिझेलचे दर ८९ रुपये ६३ पैसे एवढे आहेत. विशेष म्हणजे शेजारील तेलंगणामध्ये मात्र ५ रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त आहे.
नांदेड शहरात पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत तर, धर्माबाद मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. नांदेडला सोलापूर येथील डेपोतून इंधन पुरवठा केला जातो. सोलापूर ते धर्माबाद हे अंतर सर्वात जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल या ठिकाणी जिल्ह्याच्या इतर भागाच्या तुलनेत अधिक महाग मिळते. तसेच, शेजारील तेलंगणामध्ये हैदराबाद येथून इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे तिथे 5 रुपये कमी दराने पेट्रोल मिळते.
परभणीत पेट्रोल प्रतिलिटर दर ९८ रुपये ७४ पैसे
परभणीत गेल्या काही दिवसांपासून दररोज पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९८ रुपये ७४ पैसे तर डिझेलचे दर ८८ रुपये ३८ पैसे प्रतिलिटर एवढे होते. जिल्ह्यात पॉवर पेट्रोलच्या किमतीने शतक पार केले असून त्याचे दर १०१ रुपये ५२ पैसे प्रतिलिटर आहे. वाढत्या पेट्रोलच्या दराचा सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. परभणीसाठी मनमाड येथील डेपोतून पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करण्यात येतो. हे इंधन परभणीत आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च अधिक लागतो. त्यामुळे परभणीमध्ये पेट्रोल अधिक दराने विकले जाते.
महत्वाच्या बातम्या
- गारपिटीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या : आ. संतोष दानवे
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- भरधाव कारची दुचाकीला जोराची धडक; अपघातात दुचाकीवरील दोघे ठार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

