औरंगाबाद : शाश्वत विकासाचे उद्यिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने जमीन, पाणी संवर्धन गरजेचे असून त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. वाल्मी संस्थेच्या प्रशिक्षणातून हे उद्यिष्ट साध्य करत राज्यात जलसंवर्धनाची नवी पहाट व्हावी, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी औरंगाबादेत केले.
जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे ‘मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि आमची माणसे’ या दोन दिवसीय बुद्धीमंथन कार्यशाळेचे उद्घाटन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे देखील हजर होते.
यावेळी जलसंधारण गडाख म्हणाले, जमीन आणि पाणी या नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. उपलब्ध जमीन, पाणी या घटकांचा सुनियोजीत उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळणे गरजेचे असून त्यादृष्टीने वाल्मी संस्थेला अधिक बळकट करण्यासाठी कृती आराखडा जलसंधारण विभागातर्फे तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रोहयो मंत्री भुमरे यांनी राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते, विहीरी, शेततळे, रेशीम लागवडसह अनेक अपयुक्त कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रत्येक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, यासाठी प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी आणि शेतकरी सहभाग महत्वाचा आहे. त्यादृष्टीने अशा प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त असून जलसंधारण कामाला गति देण्यासाठी तसेच वाल्मी संस्थेला बळकट करण्यासाठी रोहयो विभाग सहाय्य करेल, असेही भुमरे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक नंदकुमार तर आर्दड यांनी वाल्मी संस्थेंबाबत माहिती दिली. तर पुराणिक यांनी आभार मानले.
महत्वाच्या बातम्या
- युवकांनो पोलीस दलात भरतीची मोठी संधी; गृहमंत्र्यांनी केली घोषणा
- काही नेत्यांना सेक्युरिटीची हौस; अब्दुल सत्तारांचा भाजप नेत्यांना टोला
- …म्हणून पंतप्रधान मोदींनी आधी स्वतःला लस टोचून घ्यावी; नवाब मलिकांची मागणी
- विरूष्काच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन !
- १० वीच्या राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
