औरंगाबाद: जिल्ह्यातील गारज येथे हॉलीवूड चित्रपट ‘प्लॅनेट ऑफ एप्स’ सारखे दृश्य बघायला मिळत आहे. त्याचं झालं असं की, गेल्या पंधरा दिवसांपासून एका पिसाळलेल्या वानराने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. घरात घुसून काचेच्या वस्तु फोडण्याचा सपाटा लावल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पिसाळलेले वानर घरात घुसून टीव्ही, कपाटाच्या काचा, आरशे, फोटो, चारचाकी वाहनाच्या काचा जे दिसेल ते फोडत आहे.
या वानरास घरातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यास हकलण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर धाव घेऊन जखमी करत आहे. आपण गावात आहे कि जंगलात असा प्रश्न काही नागरिकांना पडला आहे. गेल्या आठवड्यात गणेश सरोवर यांच्या घरात घुसून दुरदर्शन संच फोडला तर किरण सरोवर यांच्या घरात घुसून काचेच्या वस्तु फोडल्या. तसेच शनिवारी (दि.१९) चार वाजेच्या दरम्यान येथील जय योगेश्वर पतसंस्थेत घुसून काचेचे दोन फोटो फोडुन संगणकावर धाव घेतली असता बाहेरून ग्रामस्थांनी दगड फेकून मारल्याने संगणक वाचला, मात्र दगड फेकणाऱ्य ग्रामस्थावर हल्ला करण्यासाठी त्या वानराने पाठलाग केला.
रविवारी पुन्हा शिवनाथ कांदे यांनी दगड ऊगारला असता त्यांचा या वानराने सातशे ते आठशे फुट पाठलाग करून जखमी केले. यामुळे गावात महिला, वृद्ध, लहान मुलांमध्ये भितिचे वतावरण पसरले आहे. याबाबत ग्रामपंचायत पदाअधिकारयांनी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना संपर्क साधला असता ते फोन उचलत नसल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन या पिसाळलेल्या वानरास जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अल्लाह’ म्हटल्याने योगाची शक्ती कमी होत नाही! काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- सेवेत सामावुन घ्या! प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र : नाना पटोले
- कोरोनाचा परिणाम; फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लातूरकरांचा ‘योग दिन’
- आजपासून ३२ स्मार्ट सिटी बस रस्त्यावर, १२ मार्गांवर होणार ४४४ फेऱ्या!

