मुंबई : केंद्र सरकार बँकांचं खासगीकरण मोठ्या प्रमाणात आणि वेगाने करत आहे. केंद्र सरकारने खासगीकरणासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांची निवड केली आहे. केंद्र सरकार या सार्वजनिक क्षेत्रातील दोन्ही बँकांमधील आपला वाटा विकणार आहे. पहिल्या टप्प्यात ५१ टक्के हिस्सा विकण्याची योजना आहे.
वाढत्या थकीत कर्जामुळे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील अर्थात सरकारी कंपन्या, बँका यातील आपला हिस्सा विकून केंद्रसरकार निधी जमा करत असते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात सरकारी कंपन्या, बँकांमधील हिस्सा विकून 1.75 लाख कोटी रुपये गोळा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशातील दोन मोठ्या सरकारी बँकांमधील आपला हिस्सा विकण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि विमा कंपनीच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. वित्तीय वर्ष २२ साठी निर्गुंतवणुकीद्वारे सरकारने १.७५ लाख कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या दोन्ही खासगी बँकांचे शेअर बाजाराच्या किंमतीनुसार ४४,००० कोटी रुपये आहेत. ज्यात इंडियन ओव्हरसीज बँक (आयओबी) ची मार्केट कॅप ३१,६४१ कोटी रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशात आज विक्रमी लसीकरण ; तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली आज लस
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ

