मुंबई : पुण्यात शनिवारी (दि. १९ जून)रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुण्यातील निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. मात्र, विकेंड लॉकडाऊन अद्यापही कायम असून शनिवार-रविवार पुण्यात केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता इतर निर्बंध कायम आहेत.
पण असे असले तरी वीकेंड लॉकडाऊनच्या दिवशीच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली तुफान गर्दी पाहून कोरोनाचं गांभीर्य नाहीये का? असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन यावेळी पहायला मिळाले. या प्रकरणानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर चांगलीच टीकेची झोड उठवली होती.
काल सोशल डिस्टसिंगचे पालन न करता अटी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल केला होता. आणि आज या प्रकरणी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली होती. मात्र जामीन मिळताच त्यांची अवघ्या काही वेळात सुटकाही झाली. जगताप यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रम उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत झाला, ते मोकळे कसे? अजित पवारांना कायदे लागू होत नाहीत काय???https://t.co/fzpjhZNS91
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 21, 2021
याबाबत ट्विट करून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही ? असा सवाल उपस्थित केला आहे. ‘कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला, ते मोकळे कसे? अजित पवारांना कायदे लागू होत नाहीत काय?,’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून मविआ सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र – नाना पटोले
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘अधिवेशन जवळ आलं की कोरोना रुग्णांचे आकडे वाढतात’; प्रवीण दरेकरांची टीका
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- देशात आज विक्रमी लसीकरण ; तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली आज लस

