मुंबई : मराठी मनोरंजन क्षेत्र अवघ्या मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेउन येत असते. यात कौटुंबीक मालिकाचा मोठा सहभाग दिसुन येतो. याच कौटुंबीक मालिकेच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. कलर्स मराठी या वाहिनीवर पुढच्या आठवड्यापासुन ‘बायको अशी हव्वी’ ही नविन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांची बरीचशी कामे ही स्त्रीयांवर अवलंबुन असतात. हाच धागा असलेल कथानक या मालिकेचे आहे. राजेशिर्के यांच्या घरात सुन म्हणून जान्हवी सुन म्हणून आल्यानंतर तिचा प्रवास उलगडणारे हे कथानक असेल. एक मुलगी लग्न झाल्यानंतर स्वत: चे घर सोडून आणि स्वत:चे अस्तित्व विसरुन एका परक्या घराला आपलेसे करते. तेथील माणसांना आपलेसे करते. या बदल्यात त्या घरातील प्रत्येक व्यक्ती तिला मात्र आपल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. याच धाग्याला धरुन या मालिकेचे कथानक आधारित आहे.
https://www.instagram.com/p/CO1-e24KUx_/
युफोरिया प्रॉडक्शन आणि पिकोलो फिल्मसने या मालिकेची निर्मीती केली आहे. तर या मालिकेत मुख्य भूमिकेत विकास पाटील आणि गौरी देशपांडे हे कलाकार आहेत. तर मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शन हे विरेन प्रधान यांनी संभाळले आहे. स्त्री म्हणजे चुल आणि मुल या संस्कृतीत जरी स्त्रीचे महत्व कमी असले तरी, तिच्या शिवाय कुटुंबाची कल्पना करवता येत नाही. याच विचारसरणीचला फाटा देणारी मालिका नक्की बघा १७ मे पासुन सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी माझ्या मित्राला गमावले’, राहुल गांधींना दु:ख अनावर
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ! बॉल टेम्परिंग प्रकरणाची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता
- ‘शब्दात व्यक्त न करता येणारं दु:ख’ ; राजीव सातव यांच्या निधनानंतर रितेश देशमुखची भावूक पोस्ट
- ‘सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रासह मराठवाड्याचे मोठे नुकसान’
- ‘राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते’


