अहमदाबाद : इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची टी-२० मालिका सुरु होती. या मालिकेत दोन्ही संघातील लढतीदरम्यान आली नसेल तेवढी रंगत या सामन्यादरम्यान होत असलेल्या ट्विटर वॉरमध्ये दिसत आली आहे. यात आघाडीला आहे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांच्यात ट्विटर युद्ध सुरु होते.
यात मायकल वॉन सतत भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ सरस आहे असे म्हणत आला. मग तो भारताचा पराभव असो वा भारताचा विजय दोन्ही वेळेस त्याने मुंबई इंडियन्स हा भारतीय संघापेक्षा सरस असल्याचे बोलुन दाखवले आहे. काही वेळा तर वॉनने कहरच केला आणि चक्क भारतीय संघाला मुंबई इंडियन्सचा संघ असा उल्लेख केला आहे. मालिकेतील अंतिम सामना वगळता भारताचा विजय झालेल्या दोन सामन्यात सामनाविराचा मान हा मुंबई इंडियन्सच्या खेळांडुना मिळाला आहे.
When you say your team wasn't defeated by a national team but by a franchise team, you're not trolling your opponents, you're trolling your own team. Night all. #INDvsENG
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 18, 2021
मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडच्या संघाचा पराभव केल्यानंतर मायकल वॉनने पुन्हा आखेरच्या काही षटकात विराट कोहली ऐवजी रोहितने संघाचे नेतृत्व केले. तेव्हा कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या असा उल्लेख करत मुंबई इंडियन्सला टॅग केले. मायकल वॉनच्या या टीकेला भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने सडेतोड उत्तर दिले. उत्तर देताना जाफर म्हणाला की जेव्हा तुम्ही म्हणता की तुमच्या राष्ट्रीय संघाला एखाद्या एका लीग संघाने पराभूत केले. असे म्हणता तेव्हा हा समोरच्या संघाचा नव्हे तर तुमच्या स्वत:च्या संघाचा अपमान करता.
महत्वाच्या बातम्या
- अन् रस्ता ओलांडताना सापडले गलगले; भरत जाधवने केला अनुभव शेअर
- इंग्रजांना पुन्हा धूळ चारली, रोहित-भुवनेश्वरच्या धमाक्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले !
- परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
- हे तर अधिकाऱ्यांना दबावात आणून भाजपने केलेलं षडयंत्र : सचिन सावंत
- भारतातील धर्माबद्दल देसी गर्ल प्रियंकाचे मोठे वक्तव्य!


