Share

भारतातील धर्माबद्दल देसी गर्ल प्रियंकाचे मोठे वक्तव्य!

Published On: 

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री देसी गर्ल प्रियंका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. बॉलीवीडमध्ये आपल्या आभिनयाची दखल घ्यायला भाग पाडल्यानंतर हॉलीवुडमध्येही प्रियंकाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहीनी घातली आहे. नुकताच प्रियंकाने ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकनाची घोषणा तिने केली. यादरम्यान प्रियंकाने एक मुलाखत दिली. यामुलाखतीत तिला धर्माबद्दल विचारण्यात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने उत्तर देताना मोठे वक्तव्य केले आहे.

हॉलीवूडच्या प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका ओपरा विनफ्रे यांनी प्रियंकाची खास मुलाखत घेतली. या कार्यक्रमात प्रियंका आपल्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी गेली होती. या मुलाखतीत आपल्या आयुष्यात धर्माच महत्व सागंत प्रियंकाने भारतीय संस्कृती आणि धार्मिकता यांवर स्वत:च मत व्यक्त केल. यावेळी बोलताना प्रियंका म्हणाली की तिच्या आयुष्यावर हिंदु, ख्रिश्चण आणि इस्लाम धर्माचा प्रभाव असल्याचे तिने सांगीतले.

यावेळी बोलताना ती म्हणाली की, ‘माझे वडील मशिदीत गाणं गाण्यासाठी जायचे त्यामुळे मला इस्लाम धर्माबद्दल माहीती होती. माझे शिक्षण हे कॉन्व्हेन्ट शाळेत झाल्यामुळे ख्रिश्चम धर्माबद्दलही मला माहिती आहे आणि मी स्वत: हिंदु असल्यामुळे माझ्या घरात हिंदु संस्कृती जपली गेली आहे. तुम्ही भारताला धर्मापासून वेगळे नाही करु शकत. धर्म हा भारताचा खूप मोठा महत्वाचा भाग आहे. माझ्या वडिलांनी मला सर्व धर्म मानन्याची शिकवण दिली आहे. प्रत्येक धर्माचा रस्ता एकाच ईश्वरापर्यत जातो’ असे ती म्हणाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!