नागपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. दारूबंदी करण्यासाठी चंद्रपुरातील महिलांनी मोठा संघर्ष केला होता. यानंतर, मागील सरकारच्या काळात २० जानेवारी २०१५ रोजी या जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता.
‘जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे.’ असं अजब सपष्टीकरण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
आता महाविकास आघाडी सरकारने दारूबंदी उठवल्यानंतर आता सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सामान्य युवकाचा संभाजीराजेंनी केला थाटात वाढदिवस साजरा
- राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये – कॉंग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
