Share

ठाकरे साहेब …शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरला , किमान डोळयाचे अश्रू तरी बघा ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

याच मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी एक पत्रक काढले असून मुख्यमंत्री मुंबई बाहेर पडणार का ? मराठवाड्यात पाय ठेवणार का ?शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरला , किमान डोळयाचे अश्रू तरी बघा असं म्हणत शेलक्या शब्दात टीका केली आहे. पाहूया नेमकं काय म्हटलं आहे या पत्रकात ….

संपूर्ण मराठवाडा अतिवृष्टीने ग्रासला असून शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरला आहे .खरिपाचे पीके तर 100% गेली ?त्याचबरोबर चांगल्या जमिनी पावसामुळे खचुन गेल्या आहेत. असं संकट पूर्वी कधीच आलं नव्हतं, कंबरा एवढ्या पाण्यात पंधरा दिवसापासून खरिपाचे पिके आहेत. तोंडात आलेला घास गेला? अशी परिस्थिती सर्व जिल्ह्यात असून, उस्मानाबाद जिल्ह्यात तर पावसाने हाहाकार माजवला आहे. खरतर संकटात सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या साठी माय बाप म्हणून सरकार असतं .मात्र विद्यमान महाआघाडी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाविषयी कुठल्याही प्रकारच्या संवेदना नसून? हे सरकार सापशिडीच्या खेळात गुंतल आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुंबई सोडायला तयार नाहीत, खरं तर त्यांनी मराठवाड्यात पाय ठेवून बघावं, आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू प्रत्यक्ष पहावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. पण काही केल्या मातोश्रीच्या बाहेर न पडणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे पालकमंत्री सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत नाहीत. हे राजकीय दुर्दैव असून कुठे जाणार मराठवाडा? असा सवाल आता जनता करत आहे. खरंतर शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे.

मानवी जीवावर वेगवेगळे संकट येत असतात .मात्र त्याचा खंबीरपणे सामना लोकशाहीच्या जगात सरकार करीत असतं.वर्तमान काळात गेल्या आठ महिन्यापासून जगाच्या पाठीवर कोरणा संकटाने धुमाकूळ घातलेला आहे. आणि देशात सर्वाधिक कोरण्याचा विळखा महाराष्ट्रात आहे .खरं तर संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार आणि आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात यंदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. कोकणात वादळ आलं आणि पाठोपाठ मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. दोन दिवसापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला .त्याच्यापासून झालेलं नुकसान आणि उडालेला हाहाकार डोळ्यांनी पाहत नाही. मराठवाड्यातल्या औरंगाबाद बीड परभणी जालना नांदेड हिंगोली लातूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची खरीप पिके कंबरा एवढ्या पावसात आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून शेतीचे तळे झालेली अवस्था मराठवाड्यात आहे.

नुकसानीचे पंचनामे कोणी करत ना, कोणी सत्ताधारी भेटायला येत. मराठवाडा आणि शेतकरीफार मोठ्या संकटात आहे. शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरल्या गत झाली आहे. शेतीमालाचे झालेले नुकसान, सुपीक शेतीचे झालेले नुकसान. डोळ्याने पाहवत नाही. आज शेतकरी ढसा ढसा रडत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहण्यासाठी कोणीही सत्ताधारी भेटायला येत नाही . कोणी शेतीच्या बांधावर येत नाही. मराठवाड्यात एकही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे दुःख बांधावर जाऊन पाहिलेलं नाही? विरोधक आपापल्या परीने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे दौरे करत आहेत. आठ दिवसापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा दौरा झाला. त्याचबरोबर माजी कृषिमंत्री अनिल बोंडे मराठवाड्यात आहेत .बीडच्या खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी दोन वेळा आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. मात्र तरीही प्रशासन गांभीर्याने घेत नाही, पंचनामे करत नाही.

खरंतर प्रत्येक जिल्ह्याची आणेवारी पन्नास टक्क्यापेक्षा आतच आहे .ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती आहे. गावाची गाव नदीच्या पुराने वेढली सोयाबीनच्या गंजी पुरात वाहून जात आहेत .उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले .तीन पाझर तलाव फुटले, हे सारे दुःख पाहण्यासाठी मायबाप सरकार तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मुंबई सोडायला तयार नाहीत याचं दूरव वाटतं. वास्तविक पाहता तातडीने मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात पाय ठेवून शेतीच्या नुकसानीची पाहणी करायला हवी .मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खुर्चा टिकवण्या साठी तारेवरची कसरत मातोश्री बंगल्यात बसून करतात , तर विधान परिषदेचे नाव राज्यपालाकडे पाठवण्यासाठी सर्वकाही वेळ देतात? मात्र मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या जीवनात आलेल दुःख पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही?हे दुर्देव म्हणाव लागेत .

मुख्यमंत्री सोडा मराठवाड्यात एकाही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली नाही. प्रशासनाला धाक राहिलेला नाही. आज परिस्थिती गंभीर असून प्रचंड शेतकऱ्यांच्या मनामध्ये संताप व्यक्त होत आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बळी गेले? अशा परिस्थितीत अतिवृष्टीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. परतीचा पाऊस गेल्या पंधरा वर्षात कधीच पडला नाही ?खरंतर मुख्यमंत्र्यांनी वाहनांना दौरा करता आला नाही तरी हेलिकॉप्टरने दौरा केला तरी ,मांजरा काठ ते गोदावरी काठ पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आल असतं. सरकारचे डोळे उघडायला तयार नाहीत? आता शेतकऱ्यांची आशा संपलेली आहे. सरकार मदत करत नाही हे त्यांच्या लक्षात आल आहे. हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सरकारमध्ये नव्हते तेव्हा औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पंचवीस हजार रुपये हेक्टरी मदत मागितली होती. ती आज भुमीका कुठे गेली? तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. तुमच्यासमोर शेतकरी का दिसत नाही? शेतकऱ्यांचे प्रश्न का लक्षात घेत नाहीत? शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना तुम्ही मुंबईत बसून डोळ्यांनी पाहता? म्हणजेच शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळतात? खरंतर मुख्यमंत्री आले आणि काही घोषणा केली तर मायबाप सरकार कडून सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या मनाला थोडा दिलासा मिळत असतो. जनतेचे दुःख जाणुन घेणारा राजा असावा लागतो. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या डोळ्यांनी शेतकऱ्यांचे हाल पाहतात. पण प्रत्यक्ष बांधावर येऊन मराठवाड्यात पाय ठेवीत नाही . त्यांनी जर वस्तुस्थिती पाहिली तर काही कळवळा आल्यासारखं वाटेल. पण अशाप्रकारे कुठल्याही भूमिकेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत.

तिन्ही पक्षाचे सत्ताधारी आरोप-प्रत्यारोप या राजकारणात गुंतलेले आहेत. राज्याचा विरोधी पक्ष ,शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहताना त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडताना दिसतो. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील ,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण जी दरेकर, व अन्य नेते ते शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी धावपळ करताना दिसतात. काही महत्त्वाच्या सूचना ही सरकारला फडणवीसांनी केल्या. मात्र ठाकरे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही .कितीही नुकसान झालं तरी त्यांच्याकडे बघायला तयार नाही. मायबाप सरकारच्या संवेदना बोथट झाल्या नव्हे तर भावना नसलेल हे सरकार असून, केवळ सत्तेच्या नशेत सरकार मशगुल झालेल दिसत आहे.– राम कुलकर्णी (राज्य प्रवक्ता भाजपा)

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!